Friday, August 20, 2010

मुक्ता

चौकटीतला चंद्र


मी उभी होते...अगदी स्तब्ध अन निश्चल..आज माझ्या खिडकीची कवाडे उघडली होती...त्या लाकडी चौकटीतून तो चांदवा माझ्याकडे एकटक पहात होता...त्याची शीतल चंद्रप्रभा चौकटीतून आत डोकावू पहात होती...माझ्या अंतरंगाला स्पर्शून ती मला म्हणत होती...का रोखतेस मला...येउदे मला आत अन घेऊदे तूला कवेत...आज या पौर्णिमेच्या रात्री सारे काही विसरून जा...विरघळून जा...न्हाऊन घे या शीतल चांदण्यात...तिच्या त्या आर्जवी बोलण्याने मी हरवून गेले होते ...बेभान झाले होते..उरले होते फक्त मी अन माझा चौकटीतला चंद्र...


Thursday, August 5, 2010

कृष्ण्मेघानी दाटी केलेल्या डोंगररांगा...

भातलावणी

पावसाळ्याचे दिवस आहेत असे पुण्यात राहून जाणवणार नाही पण जरासे बाहेर डोकावले म्हणजे मावळात आणि मुळशीला गेलं तर पावलोपावली पावसाच्या खुणा दिसू लागतात...कडेकपारीतून वाहणारे धबधबे...हिरवाईने नटलेले तोरणा, राजगड अन सह्याद्रीचे कडे...खोऱ्यात लावणीसाठी पाण्याने ओतप्रोत भरलेली भातखाचरे...कणाकणात भरून राहिलेली हिरवाई आणि पाहणाऱ्याला मोहवून टाकणारी धुक्याची दुलई...हे सारे पाहून काही रेखाटावसे वाटले..तोरण्याच्या पायथ्याशी वेल्हे गावात भात लावणीचे हे दृश्य दिसले आणि ते अलगद कागदावर उतरले...

एकाकी ...

अथांग पसरलेल्या समुद्रात एखादा खडक किंवा शीळा खूप सुदर भासते...निळ्या उसळणाऱ्या लाटांमध्ये त्याचे एकाकीपण अधिक जाणवते ...

Shikara