Saturday, December 11, 2010

राधेश्याम

राधा भोळी कृष्णावरती भाळून गेली
भेटायाला नजरा लाखो टाळून गेली
अशा अवेळी वरमाला तिज कुठे मिळावी
दोन कळ्यांनी वरले ज्या ती माळून गेली...

Thursday, December 9, 2010

निर्झर ...

झऱ्याचा खळखळणारा आवाज ...
मंजुळ पाखरू कुठे घालतंय साद...
अश्या गूढ शांततेत सख्या...
तुझ्या श्वासांची साथ...

हिमशिखरे

Sunday, October 17, 2010


असं म्हणतात प्रत्येक शहराचा एक वास असतो...प्रत्येक शहराला स्वतःची एक प्रतिमा ,एक व्यक्तिमत्व असते..बेंगळूरू चा हा वास अगदी पहिल्यावेळी भावला होता...Banglore च्या प्रेमापेक्षा सुधा IISc च्या प्रेमाने मला परत campus मध्ये खेचून आणले . Bioinfo. Workshop च्या निमित्ताने या सुंदर शहरात मी आले ...जसे स्टेशन वर उतरले तसे परत एकदा गोड कानडी शब्द कानावर पडू लागले ...अबोली चे गजरे माळलेल्या मुली,स्त्रिया पहिल्या आणि "incredible south" पुन्हा प्रत्ययास आलं ...IISc मध्ये पुन्हा एकदा राहण्याचा योग आला...सुखावणारी जागा...कण अन कण हिरवा हिरवा असणारा IISc चा campus, एकदा आत शिरलं की बाहेरच्या जगाला विसरायला लावणारा ...माणसांचे कलकलाट नाहीत आणि गाड्यांचे गोंगाट नाहीत ...मनात बोलले तर स्वतःचा आवाज देखील स्वतःला मोठा वाटावा इतकी शांतता ...आणि खर सांगायचे तर इतकं समाधान ...पेन्सिल आणि कागद हातात घेतला आणि पाहिले तर प्रत्येक फुल अन पान , झाडाचे प्रत्येक खोड चिताराव असे...शहरात असून सुद्धा वेगळे वसवलेलं असे विश्व ....इथे प्रत्येक जण जरी कामात व्यस्त तरीही इतरांशी जोडलेलं...दिवस दिवसभर फारसे कोणाशी न बोलता देखील इथे दिवस कसा पटकन सरतो हे अनुभवलं...प्रत्येक झाडापाशी थांबावसे वाटे...प्रत्येक फुलाला विचारावसे वाटे...सगळी हिरवाई लपेटून घ्यावीशी वाटे...एरवी इतकं बोलणारी मी इथल्या जंगलात गेले की हरवून जात असे...उठून room वर यावसं वाटायचे नाही...रात्री झोपताना सुद्धा झाडांच्या गर्द सावल्यांची साथ...थंड वातावरण अन मंद गाण्याच्या लहरी...अगदी एकट्याने फिरत राहिले तरी कधीच कंटाळा येणार नाही...फक्त IISC च नाही पण बेंगळूरू शहराबाबतीत पण हेच लागू होत..प्रगतीच्या पथावर घोडदौड करणारे हे शहर आपली हिरवाई देखील उत्तम रीतीने सांभाळून आहे...

dream night...

विसावलेलं घर...

कापशी आभाळ...

झावळ्या

खिडकीच्या काचेतून नारळाच्या झावळ्या दिसत होत्या.त्या एकमेकांत अश्या गुंतल्या होत्या की त्यांची छानशी चटई विणली गेली होती जणू. त्यातून पोपटी अन हिरवा प्रकाश झिरपत होता. जरी दुपारचे १२ वाजले होते तरी वाऱ्याच्या संथ झुळकी या झावळ्याना झुलवीत होत्या..statistics चे काहीसे रटाळ lecture सुरु असल्याने माझे खिडकीतून लक्ष सतत या झावळ्यान्कडेच जात होत...त्यातला तो पोपटी हिरवा प्रकाश मला चकाकणाऱ्या पाचूसारखा भासत होता...झोप टाळण्यासाठी मी त्या झावळ्यान्कडेच पहात बसले होते...तेवढ्यात एक छोटुसा सुंदर हिरवा पक्षी येऊन बसला. तिथली चुळबूळ पाहून मला उत्सुकता लागून राहिली...लक्ष देऊन पाहिल्यावर असे दिसले की त्या झाडावर पोपटांचे कुटुंबच आहे..,त्यात छोटासा मला जो पक्षी दिसला ते गुबगुबीत पिल्लू होते...त्यांची या झाडावरून त्या झाडावर काहीतरी धावपळ चालू होती...आणि ही धावपळ त्या पिल्लासाठी चालू होती...त्यंचा गडबड गोंधळ पाहून मजा वाटत होती...माझी उत्सुकता मला अनावर झाली आणि lecture संपताक्षणी मी खिडकीकडे धाव घेतली...कितीतरी तरी वेळ मी त्यांची ती धावपळ पहात होते...कोवळ्या सूर्यप्रकाशात त्या पिल्लाची पिसे हिरवी अन निळसर चकाकत होती...ते दृश्य पाहताना मनात विचार उमटत होते...असे वाटले की किती छोटेसे जीव अन किती कष्ट ते...त्यांच्या त्या हालचालींकडे पाहता मनातली मरगळ कशी चटकन निघून जावी...झावळ्यातून झिरपणाऱ्या पाचूसारख्या प्रकाशात न्हाऊन घ्यावे अन मन प्रसन्न व्हावे...तो प्रकाश मनात भरून घेऊन मी अगदी टवटवीत झाले अन खरोखरीच पुढचा दिवस अगदी प्रसन्न गेला...त्या झावळ्या आणि त्यातून झिरपणारा प्रकाश कागदावर उतरवून घ्यावासा वाटला...





Friday, August 20, 2010

मुक्ता

चौकटीतला चंद्र


मी उभी होते...अगदी स्तब्ध अन निश्चल..आज माझ्या खिडकीची कवाडे उघडली होती...त्या लाकडी चौकटीतून तो चांदवा माझ्याकडे एकटक पहात होता...त्याची शीतल चंद्रप्रभा चौकटीतून आत डोकावू पहात होती...माझ्या अंतरंगाला स्पर्शून ती मला म्हणत होती...का रोखतेस मला...येउदे मला आत अन घेऊदे तूला कवेत...आज या पौर्णिमेच्या रात्री सारे काही विसरून जा...विरघळून जा...न्हाऊन घे या शीतल चांदण्यात...तिच्या त्या आर्जवी बोलण्याने मी हरवून गेले होते ...बेभान झाले होते..उरले होते फक्त मी अन माझा चौकटीतला चंद्र...


Thursday, August 5, 2010

कृष्ण्मेघानी दाटी केलेल्या डोंगररांगा...

भातलावणी

पावसाळ्याचे दिवस आहेत असे पुण्यात राहून जाणवणार नाही पण जरासे बाहेर डोकावले म्हणजे मावळात आणि मुळशीला गेलं तर पावलोपावली पावसाच्या खुणा दिसू लागतात...कडेकपारीतून वाहणारे धबधबे...हिरवाईने नटलेले तोरणा, राजगड अन सह्याद्रीचे कडे...खोऱ्यात लावणीसाठी पाण्याने ओतप्रोत भरलेली भातखाचरे...कणाकणात भरून राहिलेली हिरवाई आणि पाहणाऱ्याला मोहवून टाकणारी धुक्याची दुलई...हे सारे पाहून काही रेखाटावसे वाटले..तोरण्याच्या पायथ्याशी वेल्हे गावात भात लावणीचे हे दृश्य दिसले आणि ते अलगद कागदावर उतरले...

एकाकी ...

अथांग पसरलेल्या समुद्रात एखादा खडक किंवा शीळा खूप सुदर भासते...निळ्या उसळणाऱ्या लाटांमध्ये त्याचे एकाकीपण अधिक जाणवते ...

Shikara